🕒 1 min read
मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेत जोरदार विरोध केला. तसेच राज्याला ‘मद्यराष्ट्र’ बनवण्याचा सरकारचा घाट असल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र आज ऑनलाईन झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटू नये असे म्हणत निर्णय मागे घेतला जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आता यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“ठाकरे सरकारच्या वाईनविक्री निर्णयाला संपूर्ण राज्यभरातून विरोध होत असल्याचे शरद पवारांच्या लक्षात आले असावे, म्हणूनच त्यांनी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय बदलल्यास हरकत नाही आणि असे केल्यास वाईटही वाटणार नाही असे म्हटले असावे”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर टीका केली आहे.
दरम्यान भारतात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. याच द्राक्षांपासून पुढे वाईन बनवण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थातच याचा फायदा होतो, परंतु या वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध होत असल्यास योग्य वेळी वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतल्यास आश्चर्य वाटू नये अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “त्या तिघांकडून मी नेतृत्व कसे करायचे हे शिकलो” हार्दिक पंड्याची कर्णधारपदावर प्रतिक्रिया
- अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा नसून श्रीमंतांचा; अब्दुल सत्तारांचा मोदी सरकारवर निशाणा!
- समीर वानखेडे यांना मोठा धक्का; मुंबईतील बारचा परवाना रद्द
- ‘रुको जरा सबर करो…’, म्हणणाऱ्या हिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ; नागपूर पोलीस करणार अटक
- Kaccha badam: गाणं म्हणून ‘हा’ गायक रातोरात झाला सुपरस्टार, व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
