🕒 1 min read
बीड : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. या मुद्द्यावरून चांगलेच राजकारण तापले असून संताप व्यक्त करण्यासाठी आता मोर्चे निघू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत असून एकमेकांवर टीका करताना अतिशय खोचक अशी टीका केली जात आहे.
मराठा समाजाचे आरक्षण, कोविड काळात काम करणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घ्यावे, भूसंपादनाचा मावेजा द्यावा, वाळू घाट सुरु करावेत, ऊसतोड कामगार कायदा करावा, आदी विविध मागण्यांसाठी सोमवारी भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हल्लाबोल केला.
विजय वडेट्टीवार म्हणतात मराठा समाजाचा आयोगच बोगस आहे. मी तर म्हणतो वडेट्टीवारचं बोगस, फडतूस आहेत. मराठा समाजाचा आयोग बोगस आहे असं म्हणत असलेले विजय वडेट्टीवार फन्टूस औलाद आहेत हे मी डायरेक्ट म्हणतो आणि वडेट्टीवारांनी येऊन दाखव आता आमच्या जिल्ह्यात, आई शप्पथ पोलिसांसह ये म्हणावं, बघ आम्ही कसा सत्कार करतो असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी मोर्चाच्या माध्यमातून वडेट्टीवारांना आव्हान केले आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावली. १५ महिने ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीत तारखांवर तारखा लांबविल्या. मराठा आयोग बोगस म्हणणारा विजय वडेट्टीवारच बोगस, फंटूश असा एकेरी उल्लेख करत जिल्ह्यात येऊन दाखव असे आव्हानही त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले, की या दोन वर्षात या सरकारने सर्व सवलती बंद केल्या असून सर्वांची वाट लावली आहे. जर महिनाभरात आरक्षणचा निर्णय झाला नाही तर पुन्हा मोर्चा काढू असा इशारा देखील सुरेश धस यांनी दिला आहे.
राज्यात महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठ्यांचे आरक्षण रद्द झाले, ओबीसींचेही राजकीय आरक्षण बंद झाले. दोन्ही आरक्षण वाचविण्यासाठी निष्क्रिय राज्य सरकारने काहीच केले नाही. मराठा समाजाच्या १७ पिढ्या या सरकारने बर्बाद केल्या असल्याचा आराेप आमदार सुरेश धस यांनी केला. यानंतर त्यांनी आता मराठा आरक्षणासह आमच्या सर्व मागण्या मान्य करा अन्यथा या सरकारला झोपू देणार नाही, असा इशाराही दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण
- टीम इंडिया श्रीलंकेत दाखल ; तीन दिवस राहणार विलगीकरणात
- औरंगाबादमध्ये मंगळवारपासून नवे नियम, शनिवार- रविवारी पूर्णपणे बंद!
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत, उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
