🕒 1 min read
औरंगाबाद : राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्व जिल्हयांना लेव्हल-३ अंतर्गत दिलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरात आता सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व त्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
औरंगाबाद जिल्हयातील कोविड-१९ विषयक बाधित परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे जिल्हयातील शहरी रुग्णांची टक्केवारी १. ३१ टक्के व ग्रामीण रुग्णांची टक्केवारी २. ५९ टक्के ऐवढी असून एकूण औरंगाबाद जिल्हयांतील रुग्णांची टक्केवारी २.१३ टक्के असून व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची औरंगाबाद शहराची टक्केवारी ६. ३९ टक्के व ग्रामीण बेडची टक्केवारी २.९६ टक्के अशी एकूण ऑक्सीजन बेडची औरंगाबाद शहराची टक्केवारी ६.०२ टक्के आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व महानगरपालिका आयुक्त औरंगाबाद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने औरंगाबाद जिल्हा क्षेत्राकरिता २९ जुन पासून सकाळी ७ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध बाबत लागू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात काय असतील निर्बंध
- अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत राहणार सुरू
- अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतिरिक्त दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत राहणार सुरू, शनिवार-रविवार पूर्णतः बंद
- मॉल चित्रपट गृहे आणि नाट्यगृह पूर्णपणे बंद
- सोमवार ते शुक्रवार रेस्टॉरंट, भोजनालय, शिवभोजन, ५०% डाईन इन, शनिवार-रविवार होम डिलिव्हरी करण्यास चार वाजेपर्यंत मुभा
- लग्नसमारंभात ५० व्यक्ती आणि अंत्यविधीला बीच व्यक्तींना उपस्थित राहण्यास मुभा
- कार्यालयीन क्षमता ५० टक्के
- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे, सायकलिंग यासाठी सकाळी पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
- सार्वजनिक बस वाहतूक 100% क्षमतेने सुरू राहील उभे राहून प्रवास करता येणार नाही
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!
- बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत, उत्कृष्ट बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी!
- वैजापूर तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण!
- महाराष्ट्रावर डेल्टा प्लस व्हायरसच संकट ; तर ‘ही’ आहे राज्यातील आजची कोरोना स्थिती
- औरंगाबादकरांना आठवड्यातून दोनदा पाणी देणार, पालकमंत्री सुभाष देसाईंची घोषणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
