Share

औरंगाबादेत मनपा आणखी चार पेट्रोल पंप सुरु करणार, मनपा आयुक्तांनी व्यक्त केला निर्धार!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : महानगरपालिका आणि इंडियन ऑइल संचलित बायजीपुरा भागातील प्रगती पेट्रोल पंपाचे उद्घाटन सोमवारी (दि.२८) सकाळी दहा वाजेच्या सुमारास पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात मनपा कर्मचाऱ्याच्या दुचाकीत पेट्रोल भरुन पेट्रोल पंपांचे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण पेट्रोल पंपास फुलांनी सजावट करण्यात आली होती. येत्या काळात मनपा आणखी चार पेट्रोलपंप सुरु करणार आहे.

या पेट्रोल पंपाच्या उभारणीसाठी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. येत्या काळात औरंगाबाद पालिकेद्वारे शहरात आणखी चार पेट्रोल पंप सुरू केले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री आयुक्तांनी केली. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, आ. अंबादास दानवे, शहर अभियंता सखाराम पानझडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांची उपस्थिती होती. महानगरपालिकेच्या वतीने पाच पेट्रोल पंप सुरू करण्याची संकल्पना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मांडली आहे.

त्यापैकी प्रगती पेट्रोल पंपाचे सोमवारी उद्घाटन झाले. यासोबतच कांचनवाडी, पैठण रोड, चिकलठाणा लगत सावंगी बायपास, गरवारे स्टेडियम व जुना हर्सुल जकात नाका जळगाव रोड या चार ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असून त्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली आहे. महानगरपालिकेचे स्वतःचे इंधन विक्री रिटेल आउटलेट सुरू करून या माध्यमातून महानगरपालिकेला आर्थिक उत्पन्नाचीया स्तोत्र प्राप्त होईल व महानगरपालिकेचा वाहनासाठी होणारा इंधन खर्च निघेल हा या मागचा उद्देश महानगरपालिका पाण्डेय यांचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!