Share

टीम इंडिया श्रीलंकेत दाखल ; तीन दिवस राहणार विलगीकरणात

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेत दाखल झाला. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. भारताचे प्रमुख खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये असल्याने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

भारतीय संघ आता श्रीलंकेत दाखल झाला असून खेळाडू २९ जून ते १ जुलै या कालावधीत हॉटेलमध्ये क्वारंटाईन असतील. त्यानंतर २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना सराव करण्याची परवानगी असेल. ५ जुलैपासून ते एकत्र सराव करण्यास सुरुवात करतील, अशी माहिती श्रीलंका क्रिकेटच्या वेबसाईटवर देण्यात आली.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार),  देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया, पृथ्वी शॉ, युजवेंद्र चहल, राहुल चहर, ऋतुराज गायकवाड.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!