Share

‘चिलापी मासे मीच उजनी धरणाच्या जलाशयात सोडले!’; पवारांनी सांगितली आठवण

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर – खासदार शरद पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला ५० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. पवार यांचे भाषण ऐकायला मिळणे,त्यांच्यासोबत गप्पा मारायला मिळणे ही देखील सुवर्णसंधी असल्याचे अनेकजण मानतात. एवढा मोठा प्रदीर्घ काळ राजकारणात घालवल्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखे भरपूर काही आहे.

पवार आपल्या भाषणात अनेक किस्से,विनोद,वेगवेगळे प्रसंग कसे घडले हे सांगत असतात.  त्यामुळे त्यांचे भाषण चांगलेच रंगताना पाहायला मिळते. फक्त भाषणच नव्हे तर खाजगीत देखील गप्पा मारताना पवार हे अनेक आठवणी सांगत असतात.

वेळापूर येथे उत्तम जानकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी शरद पवार शनिवारी सोलापूर जिल्ह्यात आले होते. हेलिपॅडवर हेलिकॉप्टरमधून लग्न समारंभाला जाताना त्यांनी उपस्थित गाडीतील मान्यवरांना एक आठवण सांगितली. ही आठवण उजनी धरण आणि त्यात सोडलेल्या चीलापी माश्यांच्या बद्दलची होती.

व्हिएतनाममध्ये चिलापी माशांची पैदास मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे मासे गाळातील घाण खातात. तसेच त्यांची वाढ झपाट्याने होते, हे कळाल्यानंतर खास व्हिएतनाममधून आणलेले हे मासे मीच एकेकाळी उजनी धरणात सोडले होते, अशी आठवण या वेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितली.

या वेळी त्यांच्यासोबत आमदार यशवंत माने,माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील उपस्थित होते. विवाहस्थळी जाताना त्यांनी उपस्थितांसोबत उजनी धरणापासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी चिलापी माशांचा किस्सा सांगितला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!