Share

Bhagatsingh Koshyari | “मलाच महाराष्ट्राचं राज्यपाल पद नकोय”, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वक्तव्य

Published On: 

Bhagatsingh Koshyari | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरुन तातडीने हटवण्याची मागणी होत आहे. असातच राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी त्यांना स्वतःलाच पद नको असल्याचं त्यांनी त्यांच्या निकटवर्तियांना सांगितलं असल्याचं समोर आलं आहे.

भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती समोर येतं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

मुंबईतून गुजरातींचा पैसा काढून घेतला तर काही उतरणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नुकतंच केलेलं वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखवल्या गेल्या. यानंतर अनेकांनी राज्यपालांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

छत्रपती शिवरायांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केल्यानंतर यावेळी महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारमधील भाजपने यावर तत्काळ भूमिका घेऊन, महाराष्ट्रातून या राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!