Share

Ajit Pawar | “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की…”, अजित पवारांचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar | मुंबई : राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर महाविकासआघाडी म्हणून या विषयावर भूमिका घेणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) खासगीत काय म्हणतात हे सांगत आपली भूमिका पवारांनी मांडली आहे.

यावेळी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगीत म्हणतात की, मला आता माझ्या राज्यात परत जायचं आहे. मग ते काही कारण आहे की काय हेही कळायला मार्ग नाही. या प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं लंगडं समर्थ करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारे वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्र ते खपवूनही घेणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, खरंतर राज्यपालांच्या वक्तव्यावर आम्ही तातडीने प्रतिक्रिया दिल्या. मी तर २४ तासाच्या आत ट्वीटही केलं होतं, नंतर मला माझी भूमिका स्पष्ट करायची होती तीही सांगितली. परंतु, माझं पुन्हा पुन्हा सर्वांना सांगणं आहे की, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न आपण बाजूला ठेवतो आणि असे गरज नसलेले प्रश्न निर्माण करतो. हे थांबवलं पाहिजे, असं देखील पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!