मुंबई : काल (२७ मार्च) बारामतीमध्ये बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात, मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार?,असे वक्तव्य केले. दरम्यान, यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात, मीच ती ओपन केली नाही तर काय घंटा मिळणार?, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आणि मुख्यमंत्री म्हणतात राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार आहे. परंतु, जनतेला कळतंय कोणाचं सरकार आहे ते’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, निधी वाटपावरून केलेल्या विधानावरुन दत्तात्रेय भरणेंना काल अजित पवारांनी आपल्या पदाची आठवण करुन दिली. ते म्हणाले की, ‘सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे यांच्या विभागातून इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक निधी दिला जात आहे. आम्हालाच मामांना विनंती करावी लागते की, बारामतीला देखील काही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्यांना माहीत नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत.’ तसेच मी तिजोरी उघडली आणि बांधकामाला पैसे दिले तरच ते देणार, असेही अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “…आधीच विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालतात”, अहिल्यादेवी होळकर स्मारक वादावरून राऊतांची टीका
- “देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात…”; राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांवर आरोप
- “…तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही”,संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना जोरदार टोला
- “…तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय?”, राऊतांचा फडणवीसांना सवाल
- भाजपच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का?- संजय राऊत


