Share

‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मागील वेळी न्यायालयाने परमबीरसिंह यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. पोलिस महासंचालकांकडून पाठवण्यात आलेला निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीरसिंह यांनी दिला नकार होता. मात्र अखेर त्यांना निलंबनाचा आदेश स्वीकारावा लागला.

शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने परमबीरसिंग यांना चांगलेच सुनावले असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायाधीश एस.के.कौल (Justice S.K. Kaul) म्हणाले की, हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. पोलीस दलाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीचा त्याच दलावर विश्वास नसेल, तर आम्ही काय म्हणायचे. आतापर्यंत आम्ही तुम्हाला खूप संरक्षण दिले आहे. आता यापुढे तुम्हाला संरक्षण मिळणार नाही, अशा स्पष्ट शब्दात परमबीरसिंग यांना त्यांनी सुनावले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच न्यायालयाने अनेक वेळा परमबीरसिंग यांना अटकेपासून संरक्षण दिले होते. मात्र आज झालेल्या सुनावणी दरम्यान परमबीरसिंग यांना आता कुठलेच संरक्षण नसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!