Share

मोदींच्या मातोश्री, इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास चोप देणाऱ्या महिलांचे भाजपने केले कौतुक

Published On: 

मुंबई : ठाण्यातील महेंद्र भवने या व्यक्तीने पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. भाजप महिला आघाडीने महेंद्र भवने याच्यावर शाईफेक करत त्याला चोप दिला आहे. यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत भाजप महिला आघाडीचे कौतुक केले आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. भातखळकर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधानांच्या मातोश्री व स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेयर कणाऱ्याला भाजप महिला मोर्चाने दिला चोप. या तमाम महिलांचे मनापासून अभिनंदन. पोलिसांनी गरळ ओकणाऱ्या अशा भामट्यांना आवरलं नाही तर याची वारंवार पुनरावृत्ती होईल.’ असे अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

महेंद्र भवने याच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे भाजप महिला आघाडीने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!