Share

‘पूर्वी म्हणायचे देश धोक्यात, आता म्हणतात मोदी धोक्यात’; नाना पटोलेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे: राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने भारतात मोदी सरकारची लोकशाही की खसगीशाही, या विषयावर फेसबुक लाईव्हद्वारे समारोपाचे सहावे चर्चासत्र रविवारी झाले. यावेळी कॉंग्रेसनेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी नाना पटोले यांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलीच टीका केली आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, खसगीकरणामुळे सर्वसामान्यांचे अधिकार संपुष्टात येतील. आज मोदी सरकार बँकेत पैसे ठेवायला आणि बँकेतून पैसे काढायलाही पैसे मागत आहेत. रेल्वे, विमानतळ, विमानसेवा, बँक, बंदरे, एलआयसी या सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण झाले. यातून सार्वभौम देशाचे स्वातंत्र्य संपुष्टात येत आहे, असं नाना पटोले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करताना नाना पटोले म्हणाले, देशाची सार्वजनिक संपत्ती खासगी उद्योजकांना विकून केंद्र सरकार देशाचे नुकसान करत आहे. पूर्वी देश धोक्यात आहे म्हणत, आता मोदी धोक्यात आहेत असे म्हणू लागले आहेत, अशा शब्दात नाना पटोले यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!