🕒 1 min read
मुंबई: ‘टेक फॉग’ अॅपवरून काँग्रेसने (Congress) सध्या भाजपला चांगलेच घेरले आहे. ‘टेक फॉग’ या अॅपद्वारे ट्वीटर, फेसबुक आणि अन्य समाज माध्यमांवर अनेक फेक अकाउंट बनवले जातात. याद्वारे पत्रकार, महिला यांना टार्गेट केले जाते, असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. यानंतर या अॅपबद्दल अनेक व्हिडिओ काँग्रेसने समाज माध्यमांवर पोस्ट केले आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्वीटर पेजवरून पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये भाजपचे धोकादायक ‘टेक फॉग’ ॲप द्वेषाचे विष कशाप्रकारे पेरत आहे, याबाबत सांगितले आहे.
‘भाजपचे धोकादायक ‘टेक फॉग’ ॲप कसे द्वेषाचे विष पेरते, कसे तुमच्या खासगी जीवनात शिरकाव करते, कसे खोट्या बातम्या पसरवते आणि कसे आपल्या गुन्ह्याचे सर्व पुरावे मिटून टाकते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरुर पाहा’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘टेक फॉग’
हे एक भाजपचे गुप्त तंत्रज्ञान आहे. जे तुमच्या खाजगीपणावर आक्रमण करते. व्हाटस ॲप आणि तुमचे सोशल मिडिया अकाउंट हायजॅक करते. आणि द्वेष पसरवते. भाजपने याचा वापर ट्रेंड, त्यांचे फोलोवर्स वाढवण्यासाठी केला. यातून टीकाकारांना, महिलांना नाहक त्रास दिला जातो. त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले जातात. तुमचे वापरात नसलेले अकाउंट चोरते. आणि त्यात फेरफार करते. भाजपने याचा वापर प्रोपागंडा करण्यासाठी वापर केला.असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
भाजपचे धोकादायक 'टेक फॉग' ॲप कसे द्वेषाचे विष पेरते, कसे तुमच्या खासगी जीवनात शिरकाव करते, कसे खोट्या बातम्या पसरवते आणि कसे आपल्या गुन्ह्याचे सर्व पुरावे मिटून टाकते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडियो जरुर पाहा.#BJPHateFactory pic.twitter.com/UPYzvvOC5l
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 11, 2022
काय आहे ‘टेक फॉग’ ?
‘टेक फॉग’ नावाचे एक अत्याधुनिक व छुपे अॅप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरले जात असल्याचा दावा स्वत: एक नाराज भाजप कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या, @Aarthisharma08 या निनावी ट्विटर अकाउंटने केला होता. भाजपची लोकप्रियता कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी टीकाकारांना छळण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवरील जनतेच्या धारणांमध्ये बदल घडवून आणण्याच्या उद्दिष्टाने याची निर्मिती करण्यात आल्याचे म्हटले गेले. यावरच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ‘टेक फॉग’ अॅप बद्दल एका बातमीचा फोटो ट्वीट करत भाजपवर हा आरोप केला आहे.त्यामुळे सध्या ‘टेक फॉग’ हा नवीन चर्चेचा विषय बनत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर;म्हणाले,’अमानुष मारहाण करण्यामुळे…’
- “…ते उत्तर प्रदेशात होऊ शकते, जर आठवलेंनी मध्यस्ती केली तर”, ‘त्या’ वक्तव्यावर रुपाली पाटील ठोंबरेंची प्रतिक्रिया
- “राजनाथ सिंहजी कोरोनातून लवकर बरे व्हा”, मुनगंटीवारांनी केली प्रार्थना
- “भाजपने मन मोठं करुन शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रिपद ध्यावं” ,रामदास आठवलेंचा सल्ला
- “राज्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचंय”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
