🕒 1 min read
उत्तर-प्रदेश : देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा(Sushil Chandra) यांनी केली. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३ ,२७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्चला मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतांनाच आता उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वोसर्वा मायावती(Mayavati) यंदाची विधानसभा निवडणूक लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
बहुजन समाज पार्टीचे खासदार सतीशचंद्र मिश्रा(Satishchandra Mishra) यांनी याविषयी माहिती दिली असून यासंदर्भात प्रसार माध्यमाशी संवाद साधत असतांना मिश्रा म्हणाले की,’माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. समाजवादी पक्षाकडे ४०० उमेदवार नसतील तर ते ४०० जागा कशा जिंकणार? समाजवादी पार्टी किंवा भाजप सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे’, असे मिश्रा म्हणाले आहेत.
दरम्यान, उमेदवारांना १५ जानेवारी पर्यंत केवळ डिजिटल प्रचार करता येणार आहे. त्यामुळे रोड शो, पदयात्रा, बाईक रँली या प्रचारावर बंदी असणार आहे. रात्री ८ नंतर प्रचाराला बंदी असणार आहे. कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तास वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात निवडणुकीचा पहिला टप्पा १० फेब्रुवारीला दुसरा १४ तर तिसरा २० फेब्रुवारीला असणार आहे. तर गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान होईल तर १० मार्चला मतमोजणी होईल. पंजाब, गोवा आणि उत्तराखंड मध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर भातखळकरांचे प्रत्युत्तर;म्हणाले,’अमानुष मारहाण करण्यामुळे…’
- पुणे महापालिकेच्या निष्क्रियेतमुळे महत्त्वाकांक्षी ‘जायका योजने’ला फटका
- “…तर मुख्यमंत्री शरद पवारांना चार्ज का देत नाहीत?”, राम कदमांचा टोला
- ‘…तेव्हा मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही’, मोदींच्या सुरक्षा त्रुटीवरून जावेद अख्तर यांचा टोला
- रत्नाकर गुट्टेंना ईडीचा पुन्हा एकदा झटका; बीड जिल्ह्यातील पोल्ट्री केली जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
