Share

नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील निकालानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

भाजपचे आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. यावेळी न्यायालयाने त्यांना काहीसा दिलासा देखील दिला आहे. राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण येण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत नितेश राणेंना अटक करता येणार नाही.

दरम्यान विरोधक महाविकास आघाडीवर दडपशाही सुरू असल्याची टीका करत आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, कोर्टाने काय निर्णय घ्यायचा, काय निर्णय द्यायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. कायदा नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात.

नितेश राणे यांना १० दिवस अटक करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र पोलिसांना दिले. यासोबतच राणे यांना ट्रायल कोर्टासमोर शरण येण्याचे आणि नियमित जामीन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज निकाली काढताना सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

१७ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने राणे यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. व्यक्तिस्वातंत्र्याबाबत परस्परविरोधी विचार आणि या प्रकरणाच्या योग्य तपासात समतोल साधण्याची गरज लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने राणे आणि दुसरा आरोपी संदेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता, परंतु या प्रकरणातील तिसरा आरोपी मनीष दळवी याच्या याचिकेला परवानगी दिली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!