मुंबई: संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. हा नितेश राणे आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. आता या पार्श्वभूमीवर नितेश राणेंवर चांगलीच टीका राजकीय वर्तुळात विरोधकांकडून होताना दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला असला तरी नितेश राणेंना अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण दिले आहे. तसेच १० दिवसांत नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर व्हावे आणि न्यायालयाकडे रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या नंतर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी नितेश राणेंवर चांगलीच टीका केली आहे.
लघु सुक्ष्म दिलासा!
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) January 27, 2022
भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी खोचक ट्विट करुन राणे कुटुंबीयांना डिवचले आहे. लघु सुक्ष्म दिलासा!, असा मजकूर त्यांनी ट्विटमध्ये लिहला आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सर्वात मर्जीतील सहकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांची ही खोचक टिप्पणी राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना अभिमान वाटला असता-आदित्य ठाकरे
“एका महान व्यक्तीच्या नावाचा विरोध भाजप करत आहे”, ‘त्या’ घटनेवरून नवाब मलिकांनी भाजपला सुनावले
वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री श्वेता तिवारी अडचणीत, म्हणाली “माझी ब्रा साइज… ”
औरंगाबादेत येणारा पर्यटक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही-आयुक्त


