मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आणि उत्तर प्रदेश निवडणुकीत शिवसेनेला धनुष्य बाण हे चिन्ह मिळाले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. तद्पश्चात याच मुद्द्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘१९८४ ची लोकसभा निवडणूक शिवसेनेने भाजपच्या कमळ निशाणीवर लढवली आणि हे रोज मिशीला पीळ देऊन मर्दपणाच्या बाता करताय’, असा खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.
1984 ची लोकसभा निवडणूक शिवसेनेने भाजपाच्या कमळ निशाणीवर लढवली. आणि हे रोज मिशीला पीळ देऊन मर्दपणाच्या बाता करतायत… pic.twitter.com/vii7zMf2sK
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 27, 2022
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना१० ते १२ जागांवर लढणार असून आतापर्यंत शिवसेनेने नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पेडणे, म्हापसा, शिवोली, हळदोणे, पणजी, परये, वारपई, वास्को आणि केपे याठिकाणी शिवसेना निवडणूक लढवणार आहे. तर उत्तरप्रदेशातून शिवसेना ५० जागांवर लढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
“डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले”
“एका महान व्यक्तीच्या नावाचा विरोध भाजप करत आहे”, ‘त्या’ घटनेवरून नवाब मलिकांनी भाजपला सुनावले
“ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र


