औरंगाबाद: खाम नदीचे सौंदर्य आणि निसर्गरम्य परिसर बघून फिरावासा वाटला. शहराचा शाश्वत विकास झाल्याचे येथे पाहायला मिळाले. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना अभिमान वाटला असता. शासनाचा एक पैसाही खर्च न करता खाम नदीचे पुनरुज्जीवन करून गतवैभव मिळवून दिल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय व इको सत्व, व्हॅरॉक, छावणी परिषद आदींचे कौतुक करून खाम नदीचा पॅटर्न महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकेत राबवण्यात यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांनी केले.
खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत खाम इको पार्कचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, खामनदीचा विकसित केलेला परिसर बघून आनंद झाला. अशी जागा निर्माण झाली की, पुनर्जीवित झाली असे कोणी विचारही केला नसेल खऱ्या अर्थाने शहराचा शाश्वत विकास झाल्याचे पाहायला मिळाले इतर शहराकडे बघितली तर शहराचे ५१ टक्के शहरीकरण झाले आहे. शहराकडे लक्ष देणारे नव्हते परंतु आम्ही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगळ्या विषयावर शहराचे विकासाच्या संदर्भात लक्ष दिले आहे.
नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, पिचींग करून दोन्ही काठावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. वॉकिंग ट्रॅक, तलाव, वृक्षारोपण, सौंदर्यीकरण, टाकाऊ साहित्यापासून सुशोभीकरण करून निसर्गरम्य असा हा परिसर बघत असताना फिरणेही झाले असल्याचे सांगून शहराच्या शाश्वत विकासासाठी पावले उचलली याबद्दल आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले व महाराष्ट्रातील इतर शहरातही खाम नदी चा पॅटर्न राबवून नदीचा विकास करावा असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले की मी येथे खाम नदी चा झालेला कायापालट बघायलाही आणि शिकायलाही आलो असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
डॉ. अवचट यांच्या रूपाने संवेदनशील लेखक, सामाजिक कार्यकर्ता आपण गमावला- केशव उपाध्ये
“ट्विटरला मोहरा बनू देऊ नका…”, राहुल गांधींचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र
दुःखद! ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांचे निधन
राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या- चंद्रकांत पाटील
ध्वजारोहणावेळी रश्मी आणि आदित्य ठाकरेंनी केला आचारसंहितेचा भंग; मुंबईत तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

