Share

“एका महान व्यक्तीच्या नावाचा विरोध भाजप करत आहे”, ‘त्या’ घटनेवरून नवाब मलिकांनी भाजपला सुनावले

Published On: 

मुंबई: सध्या मालाड येथील क्रीडा संकुलच्या नावावरुन भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार मध्ये चांगलाच वाद रंगला आहे. भाजप नेते राज पुरोहित (BJP leader Raj Purohit)यांनी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणावरच राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (State Minority Minister Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजप वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत आहे. इंग्रजांशी लढत असताना टिपु सुलतान शहिद झाले. इंग्रजांशी लढत असताना कधीही त्यांनी हार मानली नाही. ते स्वातंत्र्यसेनानी होते. त्या काळात त्यांनी इंग्रजांना हादरुन सोडले होते. मात्र सध्या त्यांच्या नावाला विरोध करण्याचं काम भाजप करत आहे. कर्नाटकामध्येही भाजपने हीच परिस्थिती निर्माण केली होती. काही काळासाठी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा (B.S. Yediyurappa) यांनी काही काळासाठी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली होती. मात्र सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम रद्द केला”, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच नवाब मलिक यांनी यासंबंधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रपती टिपू सुलतानबाबत सकारात्मक बोलताना दिसत आहेत. टिपू सुलतान यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल राष्ट्रपतींनी दिलेली माहिती भाजपच्या नेत्यांनी समजून घ्यावी असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!