Share

परमबीर सिंह यांच्या खटल्यातून सुप्रीम कोर्टाचे न्या.भूषण गवई यांची माघार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवरील सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी माघार घेतली आहे. आपण या प्रकरणी सुनावणी करू शकणार नाही,असे त्यांनी सांगितले. विभागीय चौकशी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या आदेशाविरोधात परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होती. परंतु न्या.गवई खटल्यातून बाजूला झाल्याने सुनावणी झाली नाही.

या पीठाचे सहकारी न्या. गवई यांना या प्रकरणाच्या सुनावणी करण्याची इच्छा नसल्याचे खंडपीठाचे दुसरे न्या.विनीत शरण यांनी सांगितले.न्या. गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयातही काम केले आहे. त्यामुळे या खटल्यातून ते स्वत:च बाजूला झाले आहेत. नव्या पीठासमोर याचिकेची सुनावणी घेण्यात यावी,अशी विनंती न्या.गवई यांनी सरन्यायधीश ए.व्ही.रमणा यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारचे अधिकारी एखाद्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी आपल्याला देत असल्याचे परमबीर यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी फोनवर आलेल्या धमक्यांची टेपही याचिकेसोबत न्यायालयात दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!