Share

योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती

Published On: 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभराचा सक्तीला लॉकडाउन लागू करावा, असा आदेश काल सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. लॉकडाउनला विरोध असणाऱ्या योगी सरकारने याविरोधीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज मंगळवारी सुप्रीम कोर्टाकडून योगी आदित्यनाथ सरकारला दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या लॉकडाउनच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं की, “उच्च न्यायालयाने दिलेल्या काही सूचना गरजेच्या आहेत, मात्र पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावणं योग्य भूमिका नाही. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने काही सूचना दिल्या असून पूर्वकाळजी घेतली जात आहे. पाच शहरांमध्ये लॉकडाउन लावल्याने प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात”.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला करोनाला रोखण्यासाठी उचललेली पावलं आणि उपाययोजनांची माहिती सादर करण्यास सांगितलं आहे. यासाठी त्यांना एक आठवड्याचा अवधी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळेत संचारबंदीचे आदेश दिलेत. १५ मे पर्यंत संपूर्ण राज्यात दर रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!