Share

नागपूरसाठी १० हजार रेमडेसिवीर पाठवा, हायकोर्टाचे ठाकरे सरकारला आदेश

Published On: 

नागपूर : सध्या कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन उपयोगी ठरत असल्याचे दिसत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने त्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिवाय राज्यात रेमडेसिवीरवरून वेगळाच वाद सुरूये. पण दुसरीकडे राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये इंजेक्शनचे प्रकरण कोर्टात गेलेय. नागपूरसाठी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. खंडपीठाने नागपुरातील कोरोना परिस्थितीसंदर्भात प्रसिद्धिमाध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांवरून स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.

या जनहित याचिकेवर सोमवारी न्या.एस.बी.शुक्रे आणि न्या.एस.एम.मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. तुषार मांडलेकर म्हणाले की, ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २६६४ रुग्णांसाठी ५३२८ कुप्यांची व्यवस्था केली. नागपुरात ८,२१५ रुग्णांसाठी केवळ ३३२६ कुपींचे वाटप झाले. नागपुरात भीषण कमतरता आहे. राज्य सरकारने काहीतरी करायला हवे. आपण राज्य सरकारला आपत्कालीन परिस्थितीत १० ते १५ हजार रेमडेसिविर देण्याची विनंती करू शकता का, असे ते म्हणाले. यावर राज्य सरकारने आज २५०० कुप्या दिल्याचे न्यायालयाला सांगितले.

त्यावर हे पुरेसे प्रमाण नसल्याचे कोर्टाने सांगितले. राज्य सरकारने नागपूरला किती रेमडेसिविर दिले, काय तरतूद केली, असा सवाल करून राज्य शासनाने नागपूरसाठी नक्की किती रेमडेसिविर दिले आहेत हे स्पष्ट करावे. तसेच केंद्राने महाराष्ट्रासाठी नक्की काय तरतूद केली आहे, हेसुद्धा कोर्टात सादर करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!