🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मुद्द्यावरून दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय. लसीकरण थंडावलेले असताना मात्र रेमडेसिवीरचा मुद्दा गरम झालाय. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. पण भाजपने याची पोलखोल करत राष्ट्रवादीलाच तोंडघशी पाडले. शिवाय त्यातच आज अन्न व औषध विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भाजपने रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत आपल्याला कल्पना दिली होती अशी माहिती दिली. त्यामुळे मलिक आणखीनच गोत्यात आलेत. शिंगणे यांच्या माहितीनंतर भाजपकडून मलिक यांचा खरपूस समाचार घेण्यात येत आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही मलिक यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तमाशा लावला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संबधित विभागाचे मंत्री सोडून दुसरेच मंत्री या प्रकरणात पडले. काही बोलण्यापूर्वी किमान त्या विभागाच्या मंत्र्यांना एकदा विचारायचे तरी होते असा टोला वाघ यांनी नवाब मलिक यांना लगावला आहे.
MVA मंत्रियों का आपस में तालमेल नही है ये महाविकास अघाड़ी कम महाकनफ्यूज सरकार ज्यादा है
बार बार लगातार मुँह के बल गिरना शायद इन्हे अच्छा लगता है (2/2)@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @DrShingnespeaks @bb_thorat @mipravindarekar @PrasadLadInd @abhishekpandey2
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 20, 2021
तसेच राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या आपापसांत ताळमेळ नाहीये. हे महाविकास आघाडी नव्हे तर महाकन्फ्यूज सरकार जास्त आहे. सत्ताधाऱ्यांना वारंवार तोंडावर आपटायला आनंद वाटतो म्हणून ते अशा प्रकारचे नाहक आरोप करतात अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
तर डॉ. शिंगणे यांचा हा राज्य सरकारला घरचा आहेर असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीमध्ये वसूली करायची होती. त्यामुळेच त्यांनी स्वस्तात मिळत असलेले इंजेक्शन नाकारले आणि भाजपवर चूकीचे आरोप केले, असेही दरेकर म्हणाले. या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्याला आता पुरेसा रेमडेसिवीरचा पुरवठा होणार असल्याचे शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
