Share

कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी

Published On: 

औरंगाबाद : सध्या उत्तराखंडच्या हरिद्वार येथे कुंभमेळा सुरू आहे. त्याकरिता देशभरातून हजारो भाविक गेले आहेत. पण कोरोनाचा संसर्ग पाहता कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाइन करण्यात यावे, अशी मागणी एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

याबाबत एमआयएम विद्यार्थी आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात महाराष्ट्रातून अनेक साधू व भक्त गेले आहेत. तेथे लाखोंच्या संख्येत भाविक उपस्थित होते. कोरोनासंदर्भात कुठल्याही नियमांचे पालन केले नसल्याने मेळ्यात हजारोंच्या संख्येने भाविक पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रात आधीच कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालयात बेड मिळणे, आवश्यक औषधे मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कुंभ मेळ्याहून परतलेले भाविकांच्या संपर्कात येवून इतरांना कोरोना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष पथके नेमून कुंभमेळ्यातून परतलेल्या भाविकांच्या तपासणीचे नमुने घेऊन त्यांना क्वॉरन्टाइन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!