🕒 1 min read
दिल्ली : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. अशातच, कडक निर्बंध, टाळेबंदी, व्यवसायांमधील मंदी यामुळे लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि अशातच पाल्यांच्या शाळांकडून फी ची मागणी याने आर्थिक विवंचनेत भर पडली आहे.
शाळांनी कोरोना काळातील वाढीव फी माफ करावी. तसेच, प्रत्यक्षात शाळा सुरु नसल्याने फी कमी करावी अथवा ती आकारण्यात येऊ नये अशी मागणी गेल्या वर्षभरात केली जात आहे. हा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. तर, कोरोनाने पालकच गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण होण्याची भीती निर्माण व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता एक अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. ‘ज्या लहान मुलांचे आई आणि वडील दोघांचेही कोरोनाने निधन झाले आहे किंवा एकाचा आधीच मृत्यू झाला असेल आणि एकाचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन ती मुलं 25 वर्षांची होईपर्यंत देण्यात येईल. यासोबतच मुलांना मोफत शिक्षणही देण्यात येणार असल्याचं,’ अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे.
यासोबतच, ‘ज्यांच्या घरामध्ये कमावणारा एकच व्यक्ती असेल आणि त्याचाच कोरोनाने मृत्यू झाला तर त्यांनाही पेन्शन देण्यात येईल. दिल्लीत ज्यांच्याकडे कार्ड नाही, ज्यांना धान्याची गरज आहे त्यांनाही रेशन मिळेल. प्रत्येक गरजुला महिन्याला दहा किलो रेशन मिळेल,’ अशी दिलासादायक घोषणा देखील अरविंद केजरीवाल यांनी केल्यामुळे स्थलांतरितांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- महिंद्रा तुस्सी ग्रेट हो ! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना देणार पाच वर्षांचा पगार आणि…
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांना लस ९ महिन्यानंतर ? केंद्र सरकारला प्रस्ताव
- ‘खत दरवाढीचा फायदा घेऊन विरोधक अफवा पसरवतील, योग्य निर्णय घ्या’
- व्हेंटीलेटरविना वडिलांचा मृत्यू ; अंत्यदर्शनासाठी मुलानं दुचाकीने कापले ७०० किमी अंतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
