🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.
यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय खते व रसायने मंत्री सदानंद गौडा आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहून खासगी कंपन्यांनी खतांच्या दरात वाढ करू नये यासाठी योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक चांगली पाऊल उचलत आहे. अचानकपणे फर्टिलायझर कंपन्यांनी किंमती वाढविल्या तर,विरोधक त्याचा फायदा घेऊन अफवा पसरवतील.त्यामुळे, शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय केंद्रीय मंत्री @DVSadanandGowda यांनी घ्यावा अशी पत्राद्वारे विनंती केली. pic.twitter.com/hGxSC6eMsm
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 18, 2021
‘भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक चांगली पाऊल उचलत आहे. अचानकपणे फर्टिलायझर कंपन्यांनी किंमती वाढविल्या तर,विरोधक त्याचा फायदा घेऊन अफवा पसरवतील.त्यामुळे, शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी घ्यावा अशी पत्राद्वारे विनंती केली,’ अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
खतांची किंमत वाढवली जात असल्याचा चुकीचा संदेश विरोधी पक्षाद्वारे शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात आहे. मात्र कंपन्यांनी खतांच्या किंमती खरच वाढवल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री @nstomar जी यांना पत्राद्वारे याविषयी त्वरित पाऊल उचलण्याचे आवाहन केले. pic.twitter.com/4d5FmlFrAQ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 18, 2021
यासोबतच, ‘खतांची किंमत वाढवली जात असल्याचा चुकीचा संदेश विरोधी पक्षाद्वारे शेतकऱ्यांमध्ये पसरवला जात आहे. मात्र कंपन्यांनी खतांच्या किंमती खरच वाढवल्या तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्राद्वारे याविषयी त्वरित पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे,’ असं देखील पाटील यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- मोदींना बदनाम करण्यासाठी काँग्रेस टूलकिट वापरत असल्याचा आरोप
- “तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?” राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांना लस ९ महिन्यानंतर ? केंद्र सरकारला प्रस्ताव
- ‘कोरोनाने पालक गमावलेल्या मुलांच्या शाळेची फी, बस फी सर्वच शाळांनी माफ करावी; किंबहुना…
- खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटलांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
