🕒 1 min read
यवतमाळ : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
यातच आता यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमसिंग गोपू राठोड या व्यक्तीचा वेळेवर व्हेंटीलेटर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. कर्नाटक येथील प्रेमसिंग हे कामानिमित्त येथील श्रीरामपूर भागात स्थायिक झाले. भाजीपाला व फळ विक्री करून ते उदरनिर्वाह करीत होते. पत्नी निर्मला गृहिणी असून मुलगी निर्जला दहावी उत्तीर्ण झाली आहे. तर मुलगा निरज कर्नाटकातील हुबळी येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. तो ऑल इंडिया रँकींगमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. परंतु सर्वकाही सुरळीत असताना प्रेमसिंग यांना दवाखान्यात भरती करावे लागले. मात्र अखेर त्यांना व्हेंटीलेटर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ही वार्ता कळताच कर्नाटाकतील हुबळी येथे असलेला त्यांचा मुलगा निरज याला रात्रभर दुचाकीने प्रवास करून ७०० किलोमीटर अंतर कापून पुसद गाठावे लागले. या गरीब कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून त्यांच्या मदतीसाठी पुसदकर सरसावले आहेत. रात्रभर ७०० किलोमीटर अंतर कापून पुसदमध्ये पोहोचला. मात्र, बाबांशी दोन शब्द बोलण्याची इच्छा अर्धवट राहिली. घरातील चित्र पाहून त्याने हंबरडा फोडला. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने राठोड परिवार उघड्यावर आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आ.प्रणिती शिदेंच्या बैठकीला प्रचंड गर्दी, आमदारासह माजी खासदारांवर गुन्हा
- पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त पोस्टरप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
- जालन्यात ८४१ जण कोरोनामुक्त तर ४०५ नव्या रुग्णांची भर
- मोदी राजा नाही, टीका करणे हा लोकशाहीचा अधिकार-प्रकाश आंबेडकर
- खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटलांची मागणी

