Share

कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांना लस ९ महिन्यानंतर ? केंद्र सरकारला प्रस्ताव

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : कोरोना रोगाला आळा घालण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, महाराष्ट्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ब्रेक लावण्यात आला आहे. दरम्यान, लसीकरण करून घेण्याआधी नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न असतात ! यातीलच एक प्रश्न म्हणजे कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी साधारणतः कधी लसीकरण करावं ?

काही दिवसांपूर्वी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी कोरोनातून मुक्त झालेल्यांनी ६ महिन्यानंतर लस घ्यावी, असं विधान केलं होतं. मात्र, आता हा कालावधी अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. कारण, ऍडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (एनटीएजीआय) या पॅनेलने कोरोनावर मात केलेल्या व्यक्तींना नऊ महिन्यांनंतर कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आता केंद्र सरकार याला मंजुरी देणार का ? हे महत्वाचं ठरणार आहे.

या समितीने याआधी सिरमच्या कोव्हीशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा सल्ला दिला होता. दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांनी या समितीने सुचवले होते. तज्ज्ञ मंडळींचा समावेश असणाऱ्या या पॅनलने दोन डोसांमधील अंतर किती असावं यासंदर्भात राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तपासून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्यांदा संसर्ग होऊ नये म्हणून दोन डोसमधील अंतर वाढवण्यात यावं असं म्हटल्याचं समजतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!