हैदराबाद : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या थैमानामुळे चिंताजनक वातावरणातही काही दिलासादायक व सकारात्मक असे वृत्त समोर येत आहेत.
कुठे कॅन्सरग्रस्त चिमुकला कोरोनावर मात करून घरी सुखरूप परतला, तर कुठे प्रकृती चिंताजनक असूनही प्रबळ इच्छेने कोरोना हरवत आहेत. अशीच एक सकारात्मक घटना आता समोर येत आहे. हैदराबादमधील ११० वर्षांचे रामानंदतीर्थ आणि श्रीकाकुलम इथल्या १०० वर्षांच्या सीतारवम्मा यांनी कोरोनाला चीतपट करून सर्वांसमोर आदर्श निर्माण करून दिला आहे.
विशेष म्हणजे, हैदराबादमधील किसारा भागातील एका वृद्धाश्रमात हे ११० वर्षीय रामानंद तीर्थ राहतात. त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने २४ एप्रिल रोजी सिकंदराबाद इथल्या गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर, १८ दिवस मृत्यूशी झुंज देऊन रामानंदतीर्थ यांनी कोरोनावर मात केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करून रामानंदतीर्थ यांनी नियमितपणे औषधं आणि आहार घेतला. तसंच या काळात त्यांची वृत्ती अतिशय सकारात्मक होती, अशी माहिती या रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. राजा राव यांनी दिली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना काही दिवस रुग्णालयात निगराणी खाली ठेवण्यात आले होते.
तर, शंभरी असतानाही कोरोनाला चकवा देऊन मृत्यूला हुलकावणी देणाऱ्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील 100 वर्षांच्या यल्ला सीतारवम्मा या २५ दिवस कोरोनाला लढा दिल्यानंतर कोरोनमुक्त झाल्या. उपमुख्यमंत्री धर्मना कृष्णा दास आणि स्थानिक आमदार धर्मना प्रसाद राव यांच्या थोरल्या आई असलेल्या सीतारवम्मा यांना गेल्या महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला.
त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, शंभर वर्षांच्या या वृद्ध महिलेनं अतिशय धैर्यानं आणि दृढ निश्चयानं या रोगाला तोंड दिलं. कुटुंबातील सदस्यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांना प्रोत्साहन देत, त्यांची सेवा करत या आजारावर मात करण्यास मदत केली.
महत्वाच्या बातम्या
- महिंद्रा तुस्सी ग्रेट हो ! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना देणार पाच वर्षांचा पगार आणि…
- “तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?” राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांना लस ९ महिन्यानंतर ? केंद्र सरकारला प्रस्ताव
- ‘खत दरवाढीचा फायदा घेऊन विरोधक अफवा पसरवतील, योग्य निर्णय घ्या’
- खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान द्या; केंद्र सरकारकडे चंद्रकांत पाटलांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

