Share

महिंद्रा तुस्सी ग्रेट हो ! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना देणार पाच वर्षांचा पगार आणि…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. तर, बड्या नेत्यांसह अनेक कलाकारांचा देखील कोरोनाने मृत्यू झाला आहे. या रोगामुळे अनेक कुटुंबियांना आपला आधार गमवावा लागत असून घरातील कर्ता माणूसच हिरावल्याने उदर्निर्वासासह भविष्याची चिंता सतावत आहे.

अशातच, आता भारतातील नामांकित उद्योगसमूह महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याचं पाच वर्षांचं वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. महिंद्राच्या कौटुंबिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत ही मदत दिली जाणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी आपल्या कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.

तसेच त्यांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे, ज्याअंतर्गत कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या १२ वी इयत्तेपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करेल.

शाह यांनी एमअँडएमच्या 25,000 कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, कोव्हिड – 19 च्या प्रादुर्भावामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझं थोडं कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे, त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत.

सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीशी दोन हात करत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन लढणे अपेक्षित आहे. अनेक कंपन्या या साथीच्या आजाराने संक्रमित झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत, औषधे आणि इतर मदत पुरवित असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!