Share

Sunil Raut | ज्यांनी ज्यांनी पक्ष सोडला त्यांना बाळासाहेबांची हाय लागली आहे – सुनील राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. संजय राऊत कोठडीत असल्यापासून त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत हे सतत त्यांची पाठराखण करताना दिसत आहेत. आजही त्यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारवर आणि बंडखोर आमदारांवर टीका केली. संजय राऊतांना आज जेजे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं, त्यावरून प्रतिक्रिया देत सुनील राऊत म्हणाले कि संजय राऊत यांची तब्येत ठीक आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही.

आज मैत्रीदिन असल्याच्या पार्श्वभूमीवर मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा शिंदे गटातील काही आमदारांनी व्यक्त केली होती त्यावर सुनील राऊत म्हणाले, “त्यांना उद्धव ठाकरेंनी पक्षातून बाहेर फेकलंच नव्हतं. पक्ष सोडून तेच गेले आहेत. त्यांना जर पश्चाताप होत असेल तर त्यांनी उद्धवजींशी संपर्क साधावा.” तसेच यावेळी बोलताना त्यांनी न्यायालयात सुरु असलेल्या शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईचाही उल्लेख केला. “देशातील सर्व कायदेतज्ञांचं म्हणणं आहे कि, या आमदारांना अपात्र ठरवलं जाईल किंवा त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. त्यामुळे बघू किती जण विलीन होतायेत. शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने बांधला आहे. त्यामुळे हा इतिहास आहे कि, ज्यांनी ज्यांनी हा पक्ष सोडला आहे त्या प्रत्येकाला बाळासाहेबांची हाय लागलेली आहे”, अशी जहरी टीका त्यांनी बंडखोर आमदारांवर केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!