Share

Kishori Padnekar । “अशी कशी नशिबाने थट्टा मांडली”; अमृता फडणवीसांना पेडणेकरांचे जशास तसे उत्तर

Published On: 

Kishori Padnekar । मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जितक्या जास्त प्रमाणात राजकारणात ऍक्टिव्ह असतात तितक्याच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आणि कलेच्या दुनियेत ऍक्टिव्ह असतात. त्या नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे आणि गाण्यांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच त्या झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी केलेली विधानं बरीच चर्चेत आहेत. यातच आता या भागाचा एक नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, ज्यावर नेटकरी विविध कॉमेंट्स करत आहेत. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर कमेंट केली होती. आता त्यांच्या या वक्तव्याला शिवसेना नेत्या किशोरी पडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचा मान सन्मान आहे पण त्यांची नशिबानेच थट्टा माडली असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी देवेंद्र फडणवीसांवर एक कविता रचत टीका केली आहे. सर्व नेत्यांचा अपमान करण्याचं कंत्राट अमृता फडणवीसांना दिलं असल्याची टीका पेडणेकरांनी केली.

किशोरी पेडणेकरांनी केलेली कविता –

एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव

मुख्यमंत्रीपदासाठी कटकारस्थान केली

त्याला एका ‘अमृता’ची दृष्ट लागली हो..

त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रीपद आले…

अशी कशी नशिबाने थट्टा आज मांडली…

अशा शब्दांत अमृता फडणवीसांच्या वक्तव्याचा पेंडणेकरांनी चांगलाच समाचार घेतला.

नेमकं काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस ?

‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना सुबोध भावे याने एक प्रश्न विचारला, ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर तुमच्या समोर कोणाचा चेहरा येतो? यावर त्या पटकन हात जोडतात आणि म्हणतात की, “श्री. उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान, सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला. तर त्यांचं हे थेट उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षकही थक्क होऊन जातात.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!