Share

Manisha Kayande | सावित्रीच्या लेकी म्हणायचं मग ही काय तुमची सावत्र लेक आहे का? – मनीषा कायंदे

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : परवा दिवशी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. इतकेच नाही तर या आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यावर या पीडितेला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, अमानुष पद्धतीने झालेल्या अत्याचारामुळे पीडितेची प्रकृती बिकट असून नागपुरात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याच घटनेवर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. सावित्रीच्या लेकी असं म्हणायचं मग ही काय तुमची सावत्र लेक आहे का?, असा सवाल त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना विचारला आहे.

कायंदे म्हणाल्या, “भंडारा जिल्ह्याला सहा दिवस पोलीस अधीक्षक (एसपी) नव्हते. आधीचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या दबावामुळे तिथून हटवण्यात आलं. त्यामुळे आज एका पीडितेला न्याय मिळायला दिरंगाई होत आहे. कदाचित पोलीस अधीक्षक असते तर या घटनेला वेगळं वळण मिळालं असतं. तपासात दिरंगाई झाली नसती. सत्तेच्या लालसेपोटी भोंडेकर हे शिंदे गटात गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे दबाव टाकून त्यांनी अधीक्षक वसंत जाधव यांना हटवलं. भंडाऱ्यासारख्या संवेदनशील जिल्ह्याला सहा दिवस अधीक्षक नसणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे.”

पुढे त्यांनी चित्रा वाघ यांचं नाव न घेता संदर्भ दिला व त्या म्हणाल्या कि, “भाजप नेत्या पत्रकार परिषद घेतात आणि सावित्रीच्या लेकी असं म्हणतात मग ही काय तुमची सावत्र लेक आहे का? त्यामुळेच आमची मागणी आहे हि केस स्पेशल कोर्टात चालवावी, पीडितेला मनोधर्य योजनेअंतर्गत निधी मिळावा आणि महत्वाचं म्हणजे कुणीही राजकारण करू नये. कारण पीडितेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये अशा सूचना रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या का?, अशी आम्हाला शंका वाटते. शिवसेनेतर्फे आम्हाला मदत निधी द्यायचा होता. तो सुद्धा पीडितेच्या कुटुंबीयांना देऊ दिला नाही”, अशी माहितीही मनीषा कायंदे यांनी दिली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरूनही सरकारवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!