Share

Ramdas Kadam । बाळासाहेब जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत गेली असती का? रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना सवाल

Published On: 

🕒 1 min read

Ramdas Kadam । मुंबई : राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला धक्का दिला, त्यांनतर सुरु झालेले आरोप प्रत्यारोपांचे सामने अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. कधी महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप आणि मनसे, तर कधी मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे सामने रंगताना दिसून येत आहेत. त्यातच आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्र भर सध्या दौरे सुरु आहेत. यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना सवाल करत टीका केली आहे.

रामदास कदम गेल्या काही दिवसांपासून ऍक्टिव्ह मोड मध्ये आले आहेत. तसेच सध्या त्यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे आले आहेत. रामदास कदम म्हणाले की, बाळासाहेब जिवंत असते तर शिवसेना काँग्रेससोबत युती करु शकली असती का? याचं उत्तर मला आदित्य ठाकरे यांनी द्यावं आणि नंतर गद्दाराची व्याख्या ठरवावी. पर्यावरण मंत्री असताना माझ्या खात्याचा सर्व कारभार आदित्य ठाकरेच चालवायचे असा गौप्यस्फोटही त्यांनी केलाय. तसंच फ्रेन्डशीप डे साठी माझ्या मातोश्री आणि उद्धवजींना शुभेच्छा.

यानंतर पुढे ते म्हणाले कि, मी शिंदे आणि ठाकरेंना पुन्हा एकत्र आणण्यासाठी शिंदे गुवाहाटीला असताना प्रयत्न केला. मात्र तेव्हा ते झालं नाही. आता लढाई कोर्टात आहे. त्यामुळे आता ते एकत्र येतील की नाही यावर बोलणं योग्य नाही, असं सूचक वक्तव्यही रामदास कदम यांनी केलंय. मंत्रिमंडळ विस्तारावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारहे सरकारवर टीका करत आहेत. त्याबाबत विचारलं असता अजित पवार हे चांगले विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना माझ्या नेहमी विरोधी पक्षनेता राहण्यासाठी शुभेच्छा असल्याचा टोलाही कदम यांनी अजितदादांना लगावलाय.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!