🕒 1 min read
मुंबई : मुंबईतील आरे मेट्रो कारशेडवरून सुरु असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. अनेक पर्यावरणवादी संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी या मेट्रो कारशेडला विरोध केला होता. यातच आता कारशेडच्या कामाला स्थागिती देण्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
“काही विघ्नसंतोषी लोकांनी मुंबई मेट्रोचं काम बंद पाडलं होतं. उद्धव ठाकरे सरकारने आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रो कारशेडचं काम जोरात सुरु केलं आहे. त्यामुळे पुढच्या नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये मेट्रो रुळावर धावेल”, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Kishori Padnekar । “अशी कशी नशिबाने थट्टा मांडली”; अमृता फडणवीसांना पेडणेकरांचे जशास तसे उत्तर
- NCP | औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रात आहे, हे दिल्लीश्वरांनी लक्षात घ्यावं – सुरज चव्हाण
- Devendra Fadnavis । आम्ही सरकारमध्ये आलो आणि ओबीसींना आरक्षण मिळालं; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- MNS on Governor| राज्यपालांनी वादग्रस्त विधान करून आपल्या बुध्दीमत्तेची कुवत सिद्ध केली – हेमंत संभूस
- Devendra Fadnavis । मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होईल; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
