🕒 1 min read
पुणे: मराठी प्रकाशन व्यवसायाला व्यावसायिक रुप देणारे मेहता पब्लिशिंग हाऊसचे कार्यकारी संचालक सुनिल मेहता यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ३१ डिसेंबर रोजी पॅनक्रियाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना पुण्याच्या पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी होत गेले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचं निधन झालं.
मराठी प्रकाशन व्यवसायाला व्यावसायिक स्वरुप देण्यात सुनील मेहतांचा (Sunil Mehta) मोठा वाटा राहिला. नवनवीन लेखक आणि विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. साठच्या दशकात सुनील मेहता यांचे वडील अनिल मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची (Mehta Publishing House) स्थापन केली.
तरुण वयातच सुनील मेहता यांनी प्रकाशन व्यवसायात काम सुरु केलं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात सुनील मेहता यांचा मोलाचा वाटा होता. तसेच अनेक लेखकांना देखील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी मेहता पब्लिशिंगच्या माध्यमातून केले. आज बुधवारी दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झालं असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बेकायदेशीर नियुक्ती; पाटील यांना धमकीचे फोन!
- मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप? ; जाणून घ्या कारण
- ‘ठाकरे सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही’; किरीट सोमय्यांची टीका
- धर्मामुळे कुशल टंडनसोबत ब्रेकअप केलं म्हणणाऱ्यांना गौहर खानचं सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
