🕒 1 min read
मुंबई : छोटया पडद्यावरील बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात बऱ्याच जोडया बनतात, त्यापैकी एक गौहर खान (Gauhar Khan) आणि कुशल टंडन (Kushal Tandon) यांची जाेडी होती. मात्र गौहर खानने आता लग्न केलं असून आपला भूतकाळ मागे सोडला आहे. नुकतंच बिग बॉस ७ मधील ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील (social media) एका युजरने कुशल टंडनसोबतच्या नात्यावरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता गौहर खानने त्यास प्रतिउत्तर दिलं आहे.
दरम्यान अभिनेत्री गौहर खान आणि तिचा माजी प्रियकर कुशल टंडन यांच्यातील धर्मामुळे ब्रेकअप झाल्याच्या अफवांवर अभिनेत्रीने सोशल मीडियावर “Hey Loser, I’m a Muslim” प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर एका युजरने गौहर खानवर कुशल टंडनचं धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसेच कुशल टंडन आणि गौहर खान धर्मामुळेच (religion) एकमेकांपासून दूर गेल्याचं बोललं जात आहे. गौहर खानकडून कुशल टंडनवर धर्म परिवर्तन करण्यासाठी जोर दिला जात होता आणि त्यातूनच ते वेगळे झाले असा दावा आहे. याच मुद्द्यावरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
तसेच “भारतात अजूनही हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगळे कौटुंबिक कायदे आहेत हे बाहेरच्या जगाला माहिती नाही. हिंदूंनी धर्मनिरपेक्ष नियमांचे पालन केले पाहिजे. मुस्लिम चार बायका ठेवू शकतात आणि शरियाच्या नावावर त्यांच्या बायका आणि मुलींच्या शिक्षणावर बंदी घालू शकतात. #UniformCivilCode सर्व भारतीयांना लागू करणे आवश्यक आहे,” असंही या युजरने म्हटलं होतं.
Hey loser ! I’m a Muslim , and no body can ban us from having our rights , india is secular, it’s a democracy, not a dictatorship like u would desire ! So stay put in the comfort of your American status , n stop inciting hate in my country ! https://t.co/wvTTA8ZLMe
— Gauahar Khan (@GAUAHAR_KHAN) January 9, 2022
गौहर खान आणि कुशल टंडनमध्ये बिग बॉसच्या घरात सुरु झालेलं प्रेमप्रकरण एक वर्षाहून अधिक काळ सुरु होतं. मात्र २०१४ मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. कुशलने सोशल मीडियावरुन गौहर खानसोबतच्या ब्रेकअपची माहिती दिली होती. मात्र अजूनही दोघे खूप चांगले मित्र आहेत. मात्र सोशल मीडियावरील या पोस्टमुळे पुन्हा गौहर खान आणि कुशल टंडन चर्चेत आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही..
- रोहित शर्माचा नवा लूक पाहून तुम्हीही व्हाल हैराण; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
- भारत-चीन प्रश्नी लष्कर प्रमुख म्हणाले, ‘युद्ध करायची वेळ आलीच तर…’
- औरंगाबादेतील गर्दीला ‘लक्ष्य’ करणार जिल्हाधिकार्यांनी स्थापन केलेली भरारी पथके..!
- ‘टेकफॉग अॅपचा विरोधकांविरुद्ध वापर करणाऱ्या भाजपवर कारवाई करा’; सतेज पाटलांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
