Share

अजय देवगणने स्वतःला लिहिलं पत्र ; म्हणाला, “अभिनेता म्हणून अपयशी..”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अजय देवगण (Ajay Devgn)  हा आहे. त्याने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र सिनेसृष्टीतील करिअरच्या सुरुवातीस त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. नुकतच सोशल मीडियावर अजय देवगणने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वत:चा उल्लेख करत स्वत:ला (himself) पत्र लिहिले (wrote a letter) असून त्यातील मचकूर वाचून चाहत्यांना मात्र धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर अजय देवगण बऱ्यापैकी सक्रिय असतो. ५२ वर्षीय अजय देवगणने २० वर्षांच्या अजय देवगणसाठी म्हणजेच स्वत:लाच एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये करिअरच्या सुरुवातीला त्यास बऱ्याच चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता, डान्स शिकण्याची गरज असल्याचा सल्ला देण्यात आला होता अशा अनेक गोष्टींचा उल्लेख अजयने त्या पत्रात केला आहे.

https://www.instagram.com/p/CYnXMoRIRwM/?utm_source=ig_web_copy_link

तसेच “ एक अभिनेता असल्यामुळे या जगात तुम्ही स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत असता. मी इमानदारीने सांगेन की तुला अनेक नकार झेलावे लागले. अनेक प्रयत्न करुन तू इथे फिट होण्याच प्रयत्न करत राहिलास. मात्र कधीकधी अपयश (fail) देखील येते. तू जेव्हा अभिनेता म्हणून अपयशी होशील तेव्हा लोक तुझ्यावर टीका करतील, संशय घेतील या सर्व गोष्टींचा सामना करणे कठीण आहे. कदाचित तुलाही तुझ्या स्वप्नांवर शंका वाटेल. तरी देखील एक दिवस तुला जाणवेल की मी जसा आहे तसाच रहायला हवे. त्यामुळे कधीही थांबायचे नाही” या आशयाची पोस्ट अजय देवगणने शेअर केली आहे.

दरम्यान अजय देवगणने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलीवूडमध्ये गेल्या ३१ वर्षांपासून अजय बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. दिग्दर्शक वीरु देवगणचा मुलगा असून त्यांनी अनेक चित्रपटांमधले अॅक्शन सीन केले आहेत. त्या अॅक्शनची आजही चाहत्यामध्ये चर्चा होत असते.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!