🕒 1 min read
औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बेकायदेशीर पदभरती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विदयापीठ निधीतून तात्पुरत्या स्वरुपात प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकराने वेतनाचे कायमस्वरुपी आर्थिक वेतन दिल्यानंतर २८ सहाय्यक प्राध्यापकांची पदनिर्मितीच नियमबाह्य पद्धतीने करण्यात आली आहे. या विषयाला वाचा फोडणाऱ्या सुरेश पाटील(Suresh Patil) यांना मात्र धमकीचे फोन सुरु झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापकांची कमतरता असल्यामुळे विभाग चालवण्यासाठी सन २००४-५ मध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या नेमणुका केल्या. यातील ११ सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्या विद्यापीठ निधीतून ५ वर्षे कालावधीसाठी, १४ सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या मुलाखतीद्वारे, २ सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्या विद्यापीठ निधीतून १ वर्षे कालावधीसाठी तर एका सहायक प्राध्यापकाची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात आली होती. विद्यापीठाने निर्माण केलेल्या ३० शिक्षकपदांच्या वेतनाचा आर्थिक भार सोसत नाही म्हणून या पदाच्या वेतनाचे कायमस्वरुपी आर्थिक दायित्व स्वीकारावे, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे २०११ मध्ये विद्यापीठाने पाठवला.
३० जानेवारी २०१८ रोजी उच्च शिक्षण संचालनालयाचे अवर सचिव विजय साबळे यांनी या शिक्षक पदांची निर्मिती कोणत्या आधारावर करण्यात आली, याबरोबरच काही महत्वाचे प्रश्नही विद्यापीठ प्रशासनाला विचारले होते. विद्यापीठ प्रशासनाने राज्य सरकारची दिशाभूल केली. नियम डावलून नव्हे तर निकष पायदळी तुडवत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २८ प्राध्यापकांना नियुक्ती दिली. त्याच्या विरोधात सुरेश पाटील यांनी त्यांच्या वेब पोर्टलवर पुराव्यांसह मालिका सुरू केली होती . त्यामध्ये ज्या प्राध्यापकांनी १५ किंवा त्यापेक्षा अधिक काळ विद्यापीठात नोकरी केली आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
पोलीसात तक्रार देणार होतो
विद्यापीठातील २८ प्राध्यापकांची नियुक्ती बोगस असल्याबाबत मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर मला धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाली आहे. आपण हे योग्य केले नाही. तुम्हाला पाहून घेऊ अशा आशयाचे ते फोन आहेत. ते फोन कोणी केले हे शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो सफल झाला नाही. याबाबत पोलिसात तक्रार देणार होतो मात्र नेमके कोण आहे हे मला पाहायचे आहे. अशी प्रतिक्रिया सुरेश पाटील यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रमधून गोव्यात गेले अन् भाजपला गळती लागली”, राऊतांचा टोला
- मित्रपक्षच जर भ्रष्टाचार उघडकीस आणत असतील तर त्याचे गांभीर्य वेगळेच-अतुल भातखळकर
- “अल्प बुद्धी, बहु गर्वी राज्य सरकार तोंडघशी पडले’, १२ आमदारांच्या निलंबनावरून भाजपची टीका
- भाजपच्या त्या १२ आमदारांचं निलंबन कायद्यानेच; राज्यसरकारचा सर्वोच्च न्यायालयात खुलासा
- आमचे वकील गुणरत्न सदावर्तेच; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची शरद पवारांच्या आवाहनाला केराची टोपली..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
