Share

‘ठाकरे सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही’; किरीट सोमय्यांची टीका

Published On: 

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) नेहमीच ठाकरे सरकार तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप तसेच टीका करत असतात. या नवीन वर्षाच्या संकल्पावर एक व्हिडियो बनवत त्यांनी असा संकल्प केला की, माफिया सेना मुक्त मुंबई महापालिका करणार आणि घोटाळा मुक्त महाराष्ट्र सरकार करणार असल्याचा संकल्प करत त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते.

महाविकास आघाडी सरकार तसेच त्यातील नेत्यांवर टीका करण्याचे काम अजूनही त्यांचे सुरूच आहे. अशातच त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्या मार्फत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर देखील टीका केली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीवरून देखील किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप करताना सोमय्या म्हणाले, ठाणे येथील विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करणारे, ११४ सदनिका धारकांची फसवणूक करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे गुन्हे माफ करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असेल, परंतु महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता माफ करणार नाही, अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!