Share

कॉंग्रेससाठी दिलासादायक बातमी; मातब्बर नेत्यांनी केला पक्षात प्रवेश, पंजाबमधील समीकरणे बदलणार

Published On: 

🕒 1 min read

अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्यात जोरदार शीतयुध्द सुरू आहे. हा कलह दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पुढील वर्षी होत असलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद मिटवण्याचं मोठं आव्हान काँग्रेस नेतृत्त्वासमोर आहे.

अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या समर्थकांमध्ये आता पोस्टर वॉर सुरू असून पंजाब कॉंग्रेसमध्ये दुफळी माजत चालली असल्याचे चित्र आहे. पतियाळासह अनेक शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावत अमरिंदर सिंग समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले होते यानंतर सिद्धू समर्थकांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे.दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना आता पंजाबमधूनच कॉंग्रेससाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.

आम आदमी पार्टीचे माजी नेते सुखपाल खैरा यांनी आपल्या पंजाब एकता पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची घोषणा केली. सुखपाल खैरा, भटिंडा जिल्ह्यातल्या माऊरचे आमदार जगदेव सिंग कमलू आणि बर्नाला जिल्ह्यातल्या भदौरचे आमदार पिरामल सिंह खालसा या तिघांनी काल राहुल गांधी यांची भेट घेतली आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

ते म्हणाले की, आम आदमी पार्टी म्हणजे वन मॅन शो आहे. काँग्रेस सोडून आपण अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पक्षासोबत गेलो ही आपली मोठी चूक होती. त्या पक्षात अरविंद केजरीवाल यांच्यापुढे काहीही नाही. खैरा यांनी सांगितलं की ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच्या विश्वासाचाही पुनरुच्चार केला. दरम्यान, खैरा यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलतील असा अंदाज काही राजकीय विश्लेषक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!