Share

गोपीनाथ मुंडे असते तर अशा पद्धतीने ओबीसींचे आरक्षण रद्द होऊच दिले नसते

Published On: 

मुंबई – मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं असताना ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याने आता ओबीसी वर्ग देखील देखील राज्यात आक्रमक झाला असल्याचे चित्र आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात 26 जूनला चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

ओबीसींची इम्पिरिकल डेटा तयार केल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार पंकजा मुंडे यांनी केलाय. भाजप सरकार सत्तेत असताना निर्णयक्षमता होती. योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती. त्यामुळे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अध्यादेश काढले. पण या सरकारची मानसिकता तशी नाही. राज्य सरकार ओबीसींची बाजू मांडू शकले नाहीत म्हणून आरक्षण गेलं असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, स्व. गोपीनाथराव मुंडे यांना मानणारा वर्ग फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आहे. मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत असल्याने आता ओबीसी वर्गाला पंकजा मुंडे यांच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत. खरतर गोपीनाथ मुंडे असते तर अशा पद्धतीने आरक्षण रद्द त्यांनी होऊच दिले नसते असं ठामपणे अनेक मुंडे समर्थक सांगत आहेत.

राज्यसरकारच्या या गलथान कारभाराविरोधात मुंडे यांनी कुणाचीही परवा न करता प्रचंड मोठा लढा उभा केला असता आणि सरकारला झटपट ओबीसींच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडले असते असे मुंडे समर्थक सांगत आहेत.त्यामुळे असाच पवित्रा पंकजा मुंडे यांनी सुद्धा घ्यावा अशी अपेक्षा ओबीसी वर्गाला आहे.

दरम्यान, काही नेते आता मुंडे यांच्या पश्चात स्वतःला या समाजाचा तारणहार समजू लागले आहेत मात्र त्यांच्याकडे मुंडे यांच्या कडे असणाऱ्या नेतृत्वगुणांचा अभाव असल्याचे दिसून येतो. यामुळेच  आता पंकजा मुंडे यांनी या समाजाला पुन्हा संघटित करून या लढ्याचे नेतृत्व करावे अशी देखील मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!