कर्जत – आमदार रोहित पवार यांच्या बारामती एग्रो या संस्थेच्या माध्यमातून निकृष्ठ दर्जाच्या फिडचा पुरवठा झाल्याचा आरोप काही पोल्ट्री व्यवसायातील व्यावसायिकांनी केला आहे. बारामती ऍग्रोचे फीड खाऊ घातल्याने कोंबड्यानी अंडी देणे बंद केल्याचा आरोप होऊ लागला आहे. यामुळे पुरंदरसह अनेक ठिकाणच्या पोल्ट्री व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे.
दरम्यान,या सर्व पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या खास शैलीत पवार यांचा समाचार घेतला आहे.पडळकर म्हणाले, हा सर्व प्रकार म्हणजे कुठंही पवारांना पेरलं तरी घोटाळाच उगवणार हे बारामती ऍग्रोमुळे सिद्ध झाले आहे. मला त्यांना सांगायचं आहे त्यांनी या मतदारसंघात जास्तीचे लक्ष द्यावे नरेंद्र मोदींची उंची मोजायला जायचं फार पुढे आहे.
दरम्यान,एक स्वयंघोषित भावी पंतप्रधान आहेत तर दुसरे भावी मुख्यमंत्री आहेत. रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन मार्केटमध्ये आले आहे. बहुजनांच्या, उपेक्षितांच्या गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल,’ असा प्रहार पडळकर यांनी केलाय. तुम्हाला हे गोंडस बाळ दिसत असेल पण पुन्हा त्याला हातभार मिशा आल्यावर तुम्ही म्हणाल अरे हे असं कसं घडलं ? तेव्हा बहुजनांच्या पोरांनी यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे असा टोला देखील त्यांनी लगावला.
बारामती ऍग्रोविरोधात पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक
आ.रोहित पवार यांना खडेबोल सुनावत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांच्या या सर्व प्रश्नांना योगेश चौरे या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यामतून वाचा फोडली आहे. शेतकऱ्यांनी बारामती अॅग्रोकडे तक्रार केली मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप देखील चौरे यांनी केला आहे. कंपनीचे डॉक्टर पाणी, कोंबड्यांची लाळ,ब्लड चेक करण्यासाठी घेऊन गेले मात्र दोन महिन्यापासून रिपोर्ट आला नाही. नेमकी समस्या काय आहे हे देखील सांगत नसल्याचे सांगत पोल्ट्री व्यवसायिकांचे झालेले लाखोंचे नुकसान भरून द्यावे अशी मागणी देखील चौरे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांवर लाठीचार्ज
- अखेर ठरलंच ! विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं महत्वाचं विधान
- …तर काँग्रेस पक्ष आडवा येईल ; भाई जगताप यांची आक्रमक भूमिका
- ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर ‘हा’ कसा असेल’; खडसेंचा सवाल
- कुठे आणि कधी पाहता येणार WTC चा अंतिम सामना ?, वाचा सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

