🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. तसेच इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार हर्षदा काकडे यांनीही कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु त्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप निश्चित नाही. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा प्रचार केला होता. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला अशी चर्चा होती.
शेवगाव येथील जनशक्ती विकास आघाडीच्या बैठकीवेळी बोलताना काकडे यांनी ‘लोकसभा निवडणुकीमध्ये मी आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार केला म्हणजे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे नाही. मी तालुक्यामध्ये जनशक्ती विकास आघाडी या संघटनेमार्फत गोरगरिबांची सेवा करते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनशक्ती विकास आघाडीची भूमिका घेणे गरजेचे होते. परंतु आमदार संग्राम जगताप यांच्या व्यतिरिक्त पाठिंब्यासाठी कुणीही आमच्यापर्यंत संपर्क साधला असं विधान केले.
दरम्यान, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात सध्या भाजपच्या मोनिका राजळे या आमदार आहेत. त्यामुळे हर्षदा काकडे आणि मोनिका राजळे यांच्यात शेवगाव-पाथर्डी या मतदारसंघात सामना होण्याची शक्यता आहे. परंतु काकडे या जनशक्ती विकास आघाडीतून लढणार की इतर पक्षातून लढणार हे लवकरच स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
-
राधाकृष्ण विखे पाटलांनी योग्य मार्ग दाखवला, म्हणून मी भाजपात : पिचड
-
संभाजीराजेंचा दिलदारपणा, पूरग्रस्तांना कोट्यावधींची मदत
-
शिवसेनेन सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना गोवल – दिलीप वळसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
