अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : कर्जत नगरपंचायतने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवला आहे, चांगले रस्ते केले, लाईटची सर्वत्र चांगली व्यवस्था केली, फिटर युक्त पाणी पिण्यासाठी दिले, नागरिकांच्या सोयीसाठी गार्डन उभे केले. हाच खरा विकास आहे आणि याच विकासामुळे नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपला विजयी करण्याचे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. तसेच कर्जत नगरपंचायत हद्दीमधील सर्व नागरिकांचा अपघात विमा खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे स्वत: खर्च करून उतरवणार असल्याची घोषणा त्यांनी स्वत: केली आहे. कर्जत नगर पंचायतीच्या वतीने समर्थ गार्डन व शहा गार्डन या दोन उद्यानांचा लोकार्पण कार्यक्रम माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी खा.विखे बोलत होते.
खा.सुजय विखे पुढे म्हणाले की, कर्जत गावाचे शहरामध्ये रूपांतर करण्याचा शब्द आम्ही तुम्हाला दिला होता आणि तो आम्ही पूर्ण केला आहे. आज मतदारसंघातील सर्व जनतेला व नागरिकांना खऱ्या अर्थाने प्रा.राम शिंदे यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, अशी आता जनता उघडपणे बोलू लागली आहे. परंतु काळजी करू नका ही चूक पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये दुरुस्त करता येणार आहे. आपला माणूस हा आपलाच असतो यामुळे नाटक करणाऱ्याच्या मागे न राहता प्रमाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे जनतेने उभे रहावे, असे डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.
या कार्यक्रमामध्ये वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचा वाढदिवस नगरपंचायतीच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी माऊली महाराज पठाडे, नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, विद्यमान नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, मुख्याधिकारी गोविंद जाधव, प्रांताधिकारी अर्चना नसते, तहसीलदार नानासाहेब आगळे, भााबाई राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, उमेश जेवरे, उषा मेंहेत्रे, काकासाहेब धांडे, सचिन पोटरे, संजय भैलुमे, सतीश पवार, नीता कचरे, अमृत काळदाते, अनिल गदादे, राखी शहा, वृषाली पाटील, सुनील यादव, पप्पू धोदाड, वैभव शहा, सर्व नगरसेविका, नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘हसन मुश्रीफ नगरमध्ये येऊन दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे डबे खातात’
- सुजय विखे व राम शिंदे यांचे अखेर मनोमिलन; स्थानिक आमदारांसाठी धोक्याची घंटा?
- बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी मोडला – चंद्रकांत पाटील
- २६ नोव्हेंबरच्या कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा- बाळासाहेब थोरात
- ‘उद्धव ठाकरेंना कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

