Share

‘हसन मुश्रीफ नगरमध्ये येऊन दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे डबे खातात’

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा धिक्कार केला पाहिजे. ते राज्यपातळीचे राज्यकर्ते असताना केवळ कोल्हापूरचे मंत्री असल्यासारखे वावरत आहेत. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हे नगर जिल्ह्यामध्ये महिन्यातून एक किंवा दोन वेळा येतात व दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे डबे खाण्याचे काम करतात, असा गंभीर आरोप भाजप नेते व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये तीन मंत्री असून हे तिन्ही मंत्री निष्क्रीय ठरले आहेत, अशी घणाघाती टीकाही यावेळी कर्डिले यांनी केली आहे.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले पुढे म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला बहुमताने जनतेने सत्ता दिली नाही. या पक्षांनी ओढूनताणून सत्ता मिळवली आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांचा धिक्कार केला पाहिजे. ते जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून एक किंवा दोन वेळा येतात व दोन नंबरच्या धंदे करणाऱ्यांचे डबे खाण्याचे काम करतात. पालकमंत्र्यांनी ज्या दोन नंबरवाल्यांचे डबे खाले, तेच आज जेलमध्ये दिसत आहेत, असे कर्डिले म्हणाले. मुश्रीफ येथे येतात आणि वसुली घेऊन जातात, यापेक्षा दुसरे काहीही करीत नाहीत, असा आरोपही कर्डिले यांनी केला आहे.

जिल्ह्यामध्ये तीन मंत्री असूनही हे तिन्ही मंत्री निष्क्रीय ठरले आहेत, अशी घणाघाती टीका यावेळी कर्डिले यांनी केली आहे. दरम्यान, कर्डिले यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हसन मुश्रीफ नगरला केव्हा येणार व कर्डिले यांना काय उत्तर देणार, याकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!