अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांना वेगवेगळ्या राज्यांतून विरोध होत आहे. पंजाब, राजस्थानसारख्या राज्यांनी केंद्राच्या कायद्यांना डावलून नवे कृषी कायदे लागू केले आहेत. शेतकरी व कामगार विरोधी जुलमी कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आंदोलने करुन तीव्र विरोध दर्शविला आहे. कामगार व शेतकरी कायद्यांना विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी २६ नोव्हेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
ना.थोरात पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणासह देशभरातील अनेक राज्य पेटून उठले आहे. तिथे आजही आंदोलन सुरु आहेत. हे कायदे बनवताना मोदी सरकारने संसदेत तसेच इतर कोणाशीही चर्चा केली नाही. काही निवडक उद्योगपतींच्या हितासाठी कामगारांना उद्धवस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा पूर्ण पाठिंबा आहे.
कामगारांच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनी ४४ कामगार कायदे बनविले. कामगारांवर अत्याचार होऊ नये या हेतूने त्यांना संरक्षण देण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून होत आले आहे. परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेले कायदे हे कामगारांना देशोधडीला लावणारे तसेच बड्या उद्योगपतींचे गुलाम बनवणारे आहेत. काँग्रेस पक्षाने शेतकरी आणि कामगार हित लक्षात घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. कामगार संघटनांच्या या आंदोलनात आम्ही सर्वशक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे थोरात म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊत पुन्हा एकदा घेणार उद्धव ठाकरेंची मुलाखत; विषयावरून वाढली उत्सुकता
- सदाभाऊंनी आमदारकीसाठी ‘ही’ १२ नावं घेऊन राज्यपालांची घेतली भेट; आमटे, झहीर खानसह दिग्गजांची नावं
- ‘गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जुन्या योजनांना केवळ स्थगिती देण्याचं काम केले’
- ‘सरनाईक कोरोनाला घाबरतायत की ईडीला?’
- भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या गायकवाड यांचे पक्षात स्वागत- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

