Share

‘उद्धव ठाकरेंना कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टीका

Published On: 

कोल्हापूर : राज्यात मागील वर्षी ऐनवेळी राजकीय गणित बदलल्यामुळे झालेलं सत्तांतर पाहायला मिळालं. भाजप-शिवसेनेच्या महायुतीला २०१९ निवडणुकांमध्ये बहुमत मिळालं. मात्र, काही मतभेदांमुळे शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि विरोधी विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली.

या सरकारवर गेल्या वर्षभरात भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं असून हे सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत वर्तवलं जात आहे. या सरकारची आता वर्षपूर्ती होत असतानाच शिक्षक व पदवीधर आमदार निवडणुकांमुळे आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं दिसून येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. प्रशासन चालवणं हा वेगळा विषय आहे. उद्धव ठाकरे यांनी उभं आयुष्य पक्ष चालवण्यात घालवलं. त्यांचा प्रशासनाशी काय संबंध? उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चालवण्यासाठीच जन्मले आहेत. त्यांना प्रशासनाशी संबंधित शंभर प्रश्न विचारले तर कॉपी करूनही उत्तरं देता येणार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!