Share

सुजय विखे व राम शिंदे यांचे अखेर मनोमिलन; स्थानिक आमदारांसाठी धोक्याची घंटा?

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : महाराष्ट्राचे माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ.सुजय विखे पाटलांमुळे आपला विधानसभेला पराभव झाल्याचा आरोप करत पक्षाकडे तक्रार केली होती. परंतु आता लवकरच कर्जत आणि जामखेडच्या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि भाजपचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे दीर्घकाळानंतर एकत्र आले आहेत. त्यांनी एकमेकांशी हात मिळवणीही केली. आम्ही एकत्र आहोत, हा संदेश या माध्यमातून कार्यकर्त्यांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी मागील वाद विसरून या दोन नेत्यांचे खरोखरच मनोमिलन होणार का?, असा प्रश्न यानिमित्ताने कार्यकर्त्यांना पडला आहे.

कर्जत नगर पंचायतीच्या वतीने समर्थ गार्डन व शहा गार्डन या दोन उद्यानांचा लोकार्पण कार्यक्रम माजी मंत्री शिंदे व खासदार डॉ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कर्जत नगरपंचायत हद्दीमधील सर्व नागरिकांचा अपघात विमा डॉ.विखे पाटील हे स्वतः खर्च करून उतरविणार असल्याची घोषणाही यावेळी विखे यांनी केली. या कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला तो विखे आणि शिंदे यांच्या एकत्र येण्याचा. कर्जत आणि जामखेडच्या नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना शहा देण्यासाठी या दोघा भाजप नेत्यांचे एकत्र येणे लक्षवेधक ठरत आहे. उद्यानाचे उदघाटन केल्यांतर एका कारंजाजवळ बसून दोघांनी हसत हस्तांदोलन करत पोज दिली.

विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्यासह भाजपच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला. या पराभवाचे खापर विखे यांच्यावर फोडण्यात आले. विखे आणि शिंदे यांच्यातील वितुष्ट याच कारणांनी वाढले होते. कर्जतमधील शिंदे-विखे यांच्या हस्तांदोलनातूनही त्यांच्यातील मतभेद मिटल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जात असला तरी हे मतभेद कायमचे मिटले की निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आल्याचा संदेश हे नेते देत आहेत, याची आता चर्चा सुरू झाली आहे.

महतावाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!