Share

बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी मोडला – चंद्रकांत पाटील

Published On: 

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारवर गेल्या वर्षभरात भाजप नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सुरु ठेवलं असून हे सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत वर्तवलं जात आहे. या सरकारची आता वर्षपूर्ती होत असतानाच शिक्षक व पदवीधर आमदार निवडणुकांमुळे आरोप-प्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं दिसून येत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत. ते पक्ष चांगला चालवू शकतात. ते कधी आमदार झाले नाहीत. कधी खासदार झाले नाहीत. कधी नगरसेवकही झाले नाहीत आणि स्थायी समितीचे अध्यक्षही झाले नाहीत.’

‘प्रशासन चालवताना हजार प्रश्न घेऊन बसावं लागतं किंवा संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न हाताळण्याचे आदेश द्यावे लागतात. प्रशासनावर वचक असणं ही वेगळी बाब आहे, असं सांगतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पक्षावरच कायम कंट्रोल ठेवला. त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. बाळासाहेबांनी जो नियम पाळला. तो उद्धव ठाकरेंनी पाळला नाही. एकदम अंगावर जबाबदारी पडल्यावर असं होतं. त्यामुळेच राज्यातील प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आलं आहे,’ अशी जळजळीत टीका पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!